Pandamic शब्द ठरला यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सध्या सुरू असणार्‍या कोरोनाच्या आपत्तीत विपुल प्रमाणात वापरण्यात आलेला Pandamic हा शब्द यंदाचा वर्ड ऑफ द इयर ठरला असल्याचे डिक्शनरी डॉट कॉमने जाहीर केले आहे.

डिक्शनरी डॉट कॉमने Pandamic शब्दाची २०२० मधील वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषणा केली आहे. हा शब्द वर्षभर खूप चर्चेत राहिला.

या पार्श्‍वभूमीवर डिक्शनरी डॉट कॉमने पेंडेमिक शब्दाची ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषणा केली आहे. सिनिअर एडिटर जॉन केली यांनी याबाबत सांगितले की, मार्चमध्ये या शब्दाचा शोध कितीतरी पटीने वाढला. त्यानंतर दर महिन्याला या शब्दाचा शोध वाढत गेला. हा शोध १०० टक्क्यांहून अधिक आहे.

जगभरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा ९४ लाख पार झाला आहे. तर आतापर्यंत १ लाख ३७ हजार लोकांचा मृत्य झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ८८ लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

Protected Content