जळगाव : प्रतिनिधी । जळगाव नवीन बसस्थानकात खान्देश कन्या महिला मंडळाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचशे मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही नागरीकांना यांचे गांभिर्य नसल्याने जळगाव येथील बसस्थानकात विना मास्क असणाऱ्या प्रवाशाना खान्देश कन्या महिला मंडळाच्या वतीने ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.
मंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान जनजागृती करून त्यांचे गांभीर्य व बचाव करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी खान्देश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगला बारी, उपाध्यक्ष संगिता बारी, सचिव वंदना बारी, कल्पना बारी, छाया सोनवणे, पुनम बारी, छाया बारी, कल्पना सोनवणे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.