Home Cities यावल दोघा भावांचे एकाच दिवशी निधन; पटेल परिवारावर आघात

दोघा भावांचे एकाच दिवशी निधन; पटेल परिवारावर आघात

0
64


भुसावळ प्रतिनिधी । निंभोरा येथील पटेल परिवारातील दोन भावांचे एकाच दिवशी निधन झाल्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

निंभोरा (ता. रावेर ) येथील युसूफ सुपडू पटेल(वय-४८) यांचे सकाळी १० वाजता निधन झाले. संध्याकाळी ७ वाजता युसूफ पटेल यांच्या दफन विधी सुरू असताना अस्वस्थ वाटत असल्याने घरीच थांबलेले त्यांचे वडील बंधू हमीद सुपडू पटेल (वय-५८) यांचेदेखील प्राणोत्क्रमण झाले. युसूफ पटेल यांच्या पश्‍चात पत्नी २ मुली एक मुलगा असून ते अल्ताफ पटेल यांचे वडील होत. तर हमीद सुपडू पटेल यांच्या पश्‍चात पत्नी, ४ मुलं असा परिवार असून ते मुंबई येथील रेल्वे तिकीट निरीक्षक असलम पटेल,आसिफ,शफीक,पो कॉ. रफिक पटेल यांचे वडील होते. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी राहत्या घरून निघेल.दरम्यान एकाच दिवशी दोघं भावांचा मृत्यू झाल्याने निंभोरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound