Home Cities अमळनेर मुंदडा विदयालयात अभ्यासक्रमावर चर्चा

मुंदडा विदयालयात अभ्यासक्रमावर चर्चा

0
36

अमळनेर प्रतिनिधी । येथील पी.एन.मुंदडा विद्यालयात उपक्रमशिल शिक्षक प्रदिप चौधरी यांनी मुलाखत तंत्र या घटकासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले.

विद्यालयातील इ.९ वी.च्या विद्यार्थीनी कु.श्रुती पाटील हिने मुख्याध्यापकपी.एस.विंचूरकर सरांची मुलाखत घेतली. यावेळी विंचूरकर सरांनी अनेक प्रश्‍नांची उत्तरे देतांना अगदी दिलखुलासपणे शिक्षण, शेती आणि शेतकरी, नोकरी व जबाबदारी या सर्व गोष्टींवर विद्यार्थ्यांसमोर संवाद साधला. दुसर्‍या सत्रात कु.गौरी कैलास पाटील हिने इ.९वी च्या वर्ग शिक्षिकाकिर्ती सोनार यांची मुलाखत घेतली. त्यात मॅडमांना लहानपणापासून तर आजपर्यंतचे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. यावेळी बोलताना त्यांनी लहान असताना झालेले संस्कार, शिक्षक आणि आवड याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. शेवटी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या, आणि असेच नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील असा निर्धार यावेळी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound