गुवाहाटी, वृत्तसंस्था ।आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गोगोई यांच्या शरिरातील अनेक अवयव काम करत नसल्यानं त्यांना श्वसनाला त्रास होत असून त्यांनाव्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. गोगोई सध्या बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच तरुण गोगोई हे कोरोनामुक्त झाले होते. तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील ४८ ते ७२ तास गोगोई यांच्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचं हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं.