जळगाव । आगामी लोकसभा निवडणूक तसेच सण, उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरीता फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) व (3) लागू केले आहे. हे प्रतिबंधात्मक आदेश 16 मार्च, 2019 पासून पुढील 60 दिवसांपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अंमलात राहील. असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
त्याचप्रमाणे आगामी निवडणूका जमिनीचे मालक, भाडेकरु अशा कोणत्याही घराचा, मालमत्तेचा वहीवाटदार, खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण, मंदीर, गुरुद्वारा, चर्च, मस्जीद, धर्मशाळा, हॉटेल, लॉजेस इत्यादीचे विश्वस्त, संचालक मंडळ, चालक, मालक, जमीनी, घर खरेदी-विक्री करणारे व्यावसायीक, जुने व नवीन चारचारी, दुचाकी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायीक, फेरीवाले, सिमकार्ड विक्रेते, सायबर कॅफे, भंगार खरेदी-विक्री करणारे व्यावसायीक, औद्योगिक वसाहतींना मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सी, ज्वलनशील, ज्वालाग्राही पदार्थाचे साठेधारक, शस्त्र व दारुगोळा परवानाधारक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना अशा मालमत्ता व्यवहारबाबतची माहिती लेखी स्वरुपात देणे बंधनकारक आहे. असल्याचेही जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.