जळगाव प्रतिनिधी । चोरीची मोटारसायकलचा क्रमांक बदलवून ती मोटारसायकल वापरणार्यासह चोरणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून चोरीस गेलेली दुचाकी भुसावळातील आदर्श उर्फ गोल्डन तायडे हा तीचा क्रमांक बदलवून वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, पोहेकॉ अनिल इंगळे, अनिल देशमुख, रमेश चौधरी, रवी नरवाडे, संतोष मायकल, ईशान तडवी यांचे पथक तयार केले. या पथकाने आदर्शला न्यू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर याठिकाणाहून ताब्यात घेत त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव आदर्श बाळू तायडे उर्फ गोल्डन डप्ली (२३) रा. चांदमारी चाळ भुसावळ असे सांगित त्याने त्याच्याकडील एमएच १९ सीएच ४४२६ क्रमांकाची दुचाकी पोलिसांना काढून दिली.
तळवेल शिवारातून चोरली होती दुचाकी
आदर्शची विचापुस केली असता त्याचे साथीदार बबन हुसळे व अलीम शेख अकील (१९) दोघ रा. कंडारी यांनी वर्षभरापूर्वी तळवेल शिवारातून चोरल्याचे त्यांने सांगितले. पथकाने या दोघांना देखील अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी त्यांना वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.