जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आधार कार्ड अटेंडन्स (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आधार कार्ड अटेंडन्स सिस्टीम राबविण्यात येत आहे. यात सद्यस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आतापर्यंत 1 हजार कर्मचाऱ्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असून यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक बसणार आहे. हा उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद म्हणून जळगाव जिल्हा परिषद ठरणार आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याचा येण्याचा वेळ तसेच जाण्याचा वेळ रेकॉर्ड केला जाणार असल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांना वचक बसून जिल्हा परिषदेतील कामाची पातळी सुधारेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एन पाटील यांनी व्यक्त केला आहे

आधार अटेंडन्स सिस्टीम हे मंत्रालया नंतर पहिल्यांदा जिल्हा परिषद जळगाव येथे राबविण्यात येणार आहे ही सिस्टीम अगदी ग्रामपंचायत लेव्हलपर्यंत राबविण्याचा आमचा प्रयत्न असून एका ग्राम सेवकाकडे 3 ते 4 ग्रामपंचायतीचा चार्ज असल्याने त्यामुळे त्याला काम करण्यासाठी ही सिस्टीम सोयीस्कर ठरणार आहे. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन रेकॉर्ड मेन्टेन करणे शक्‍य होणार आहे.

ऑनलाइन अटेंडन्स प्रणाली मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी एन पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेली असून कामकाजात पारदर्शकता येणार असल्याचं मत जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल आहे. कामकाजात सुसूत्रता येईल आणि जे उशिरा कामावर येऊन लवकर घरी जातात अशा कर्मचाऱ्यांना चाप बसेल असे देखील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3368064686653917/

Protected Content