Home आरोग्य आज २१ नवीन कोरोना बाधीत; ३२ रूग्ण झालेत बरे !

आज २१ नवीन कोरोना बाधीत; ३२ रूग्ण झालेत बरे !

0
30

जळगाव प्रतिनिधी । गत २४ तासांमध्ये जिल्हाभरात २१ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून ३२ रूग्ण बरे झाले आहेत. यात जळगाव शहरात फक्त एक रूग्ण बाधीत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी गत २४ तासांमधील नवीन कोरोना बाधीतांची माहिती दिली आहे. यात आज २१ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून आजच ३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजचा विचार केला असता, यात यावल ११ आणि भुसावळातील पाच रूग्णांचा समावेश आहे. यासोबत मुक्ताईनगर २, रावेर, पारोळा व जळगाव शहर येथून प्रत्येकी एक कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला आहे.

जळगाव शहरात याआधी कोरोनाचा मोठा संसर्ग आढळून आला होता. गत २४ तासांमध्ये मात्र शहरात एकच रूग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे रिपोर्टमधून दिसून आले आहे. दरम्यान, गत २४ तासांमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवरच्या मृतांचा आकडा १२७७ वर पोहचला आहे.


Protected Content

Play sound