Home आरोग्य रोहिणी खडसे यांना कोरोनाची बाधा; रूग्णालयात उपचार

रोहिणी खडसे यांना कोरोनाची बाधा; रूग्णालयात उपचार

0
119

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आणि नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसेंना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात स्वत: रोहिणी यांनी ट्विटवरुन माहिती दिली. त्यांच्यावर जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपल्या ट्विटमध्ये रोहिणी खडसे यांनी म्हटले की, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

https://www.facebook.com/KhadseRohini/posts/4789815361092277


Protected Content

Play sound