चाळीसगाव प्रतिनिधी । आजपासून दिवाळीचे पर्व सुरू होत असून या दिवाळीच्या दीपोत्सवात पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांना लावून सह्याद्री प्रतिष्ठान दिवाळी सणाची सुरुवात केली आहे.
असून ज्या छत्रपती मुळे आज तमाम देवालयांमधील देव सुरक्षित आहेत त्या छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज घाट येथील पुतळ्यासमोर सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत दिवे लावून रोशनाई करून मानवंदना देऊन आज दिवाळी साजरी करायला सुरुवात केली आहे.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, गजानन मोरे, निलेश हमलाई, रविंद्र सुर्यवंशी, विनोद शिंपी, दिगंबर शिर्के, गौरव पाटील, जितेंद्र वरखेडे, सोहम येवले आदी उपस्थित होते.