जिल्हा बँक कॉलनीतून दुचाकीची चोरी; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील जिल्हा बँक कॉलनीतून मध्यरात्री घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची चोरी केल्याची घटन आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, निखील राजू सपकाळे (वय-२३) रा. जिल्हा बँक कॉलनी, पिंप्राळा परिसर हे खासगी कंपनीत कामाला आहे. कामाला जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीबी ५९९२) क्रमांकाची दुचाकी आहे. कामावर जाण्यासाठी याच दुचाकीचा वापर करतात. नेहमीप्रमाणे दुचाकी घरासमोर लावलेली होती. मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जेवण करून झोपले असता मध्यरात्री १ ते ५ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. निखील सपकाळे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे करीत आहे.

Protected Content