भडगाव

wp 15853907948453333851444303686003
आरोग्य भडगाव सामाजिक

नगरदेवळा रेल्वेगेट वस्ती परीसरात जंतूनाशक फवारणी

भडगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी नगरदेवळा रेल्वेगेट वस्तीमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली. देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता मात्र येथील वडगांव बु। ग्रामपंचायत अंर्तगत येत असलेल्या नगरदेवळा रेल्वे गेट येथील वस्तीकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले. या वस्तीमधील ग्रामपंचायत सदस्य […]

bhadagaon sanna news
भडगाव सामाजिक

भडगाव शहरासह तालुक्यात जनता कर्फ्युच्या बंदला प्रतिसाद

भडगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आज २२ मार्च रोजी भडगाव शहरासह तालुक्यात पुर्णतः बंद करून जनता कर्फ्यूला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे. येथील बाजारपेठ पाचोरा चौफुली, चाळीसगांव चौफुली, पारोळा चौफुली, मेनरोड परिसर, बस स्टॅन्ड परिसरात आज सकाळी ७ वाजल्यापासून शुकशुकाट दिसत आहे. जीवनावश्यक सेवा सोडून […]

bhadgaon news
करियर भडगाव

तांदुळवाडी येथील तरुणाची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील तांदुळवाडी येथील मयूर देशमुखने बिकट परिस्थितीवर मात करून राबराब कष्ट करून आईच्या संस्कारातून तांदुळवाडी या गावातील नवतरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत थेट पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. याबाबत माहिती अशी की, तांदुळवाडी येथील रहिवाशी लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने घरातील परिस्थिती अत्यंत हालाकीची असून वडिलांची सावली […]

bhadgaon poltry form
भडगाव सामाजिक

कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात; तहसीलदार व आमदारांना निवेदन

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे चिकनचा खप खूपच कमी झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसाय धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तहसीलदार, आमदार, पशु वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र या कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या अफवा यासाठी […]

yojna patil satkar
भडगाव सामाजिक

नगरसेविका योजना पाटील यांना राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार प्रदान

भडगाव प्रतिनिधी । यशस्विनी सामाजिक अभियान प्रमुख़ नगरसेविका योजना पाटील यांना धुळे येथे राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धुळे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या वतीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल योजनातापई पाटील यांना […]

1
भडगाव सामाजिक

गुढे गावाजवळ जामदा डावा कालवा फुटला

  भडगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील गुढे गावाजवळ गिरणा धरणाचा जामदा डावा कालवा हा आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे. जामदा डावा कालवा फुटल्याने पाणी मोठ्याप्रणात वाया गेले. तर रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनाची वाट अवघड झाली आहे. कालव्यावरील जलसेतुची भिंत तुटली आहे. कालवा फुटल्याबरोबर जामदा बंधाऱ्यातून कालव्याचा पाणीपुरवठा […]

bhadgaon 1
भडगाव

मराठा महासंघातर्फे आश्रमशाळेत शालेय साहीत्य वाटप

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील, वाक येथे शासकिय बालवस्तीगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे विद्यार्थ्यानां शालेय साहीत्य वाटप करण्यात आले. अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणुन भडगांव नगरपालिकेचे नगरसेविका योजनाताई पाटील, मुख्याध्यापक डी.डी. पाटील, वाकचे सरपंच कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते स्वप्नील पाटील, […]

WhatsApp Image 2020 02 19 at 7.26.03 PM
भडगाव

नगरदेवळा येथे पवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; दीड तासापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत

भडगाव प्रतिनिधी । लोकमान्य टर्मिनल्स वरुन दरभंगाला जाणारी (११०६१) अप लोकमान्य टिळक टर्मिनल-दरभंगा पवन एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिड तासापासून नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथे पवन एक्सप्रेस उभी आहे. पाठिमागुन येणाऱ्या सर्व गाडया उशीराने धावत आहे. तसेच या रेल्वे स्टेशनला पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे खुप हाल झाले. गाडी लेट झाल्यामुळे […]

WhatsApp Image 2020 02 18 at 11.13.04 PM
भडगाव शिक्षण

कोळगाव येथील पाटील विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कोळगाव पाटील विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वच शिक्षक-शिक्षकेतर प्राध्यापक व प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमा पुजन केले. यावेळी विद्यालयाचे […]

e3c88942 8ca0 4929 a37f 5aa7755a470dब्ब्ब्ग
Uncategorized भडगाव शिक्षण सामाजिक

कोळगाव येथील गो.पु.पाटील विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळगाव येथील गो.पु.पाटील विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वच शिक्षक-शिक्षकेतर.प्राध्यापक व प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमा पुजन केले. यावेळी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक अनिल […]