Home Cities एरंडोल एरंडोल नगरपालिकेतर्फे ९० फूट उंचीचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात

एरंडोल नगरपालिकेतर्फे ९० फूट उंचीचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात

0
37

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येथे नगरपालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुमारे ९० फूट उंचीचा ध्वज स्तंभ उभारुन स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.

आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते दिमाखदार ध्वजारोहण सोहळा सोमवारी सकाळी संपन्न झाला. राष्ट्रध्वजाला सलामी व राष्ट्रगीता नंतर तालुक्यातील आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांचे १२ वारसा चा व आजी माझी बावीस सैनिकांचा ट्रॉफी, शॉल ,पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हातचे गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी यांनी केले.  ‌यावेळी एडवोकेट किशोर काळकर. प्राध्यापक मनोज पाटील, असलम पिंजारी, शालिग्राम गायकवाड, आनंद दाभाडे, सुरेश दाभाडे, छाया दाभाडे, योगेश देवरे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, जाहीरुद्दीन शेख कासम, चिंतामण पाटील, आदी मान्यवर, नगरपालिका कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound