दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीतल्या करोलबाग येथील हॉटेल अर्पीत पॅलेसला लागलेल्या भीषण आगीमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिल्लीच्या करोलबाग या परिसरात असलेल्या हॉटेल अर्पीत पॅलेसच्या वरील मजल्यास आज पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागली. आकस्मीक लागलेल्या या आगीमुळे गाढ निद्रेत असणार्या ग्राहकांना बचावाची संधी मिळाली नाही. यामुळे यात होरपळून १७ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण होरपळले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तथापि, आग आटोक्यात आली असल्याचे वृत्त आहे.