साने गुरुजी विद्यालयाचा ८९ .२५ टक्के निकाल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दहावीच्या परीक्षेत यावल नगरपरिषद संचलित श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ८९ .२५ टक्के निकाल लागला आहे.

सन २०२३-२४ या वर्षातील मार्च २०२४च्या एस एस सी परीक्षेमध्ये पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल ८९ .२५ टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक कु. धनश्री रविंद्र महाजन९१ % द्वितीय क्रमांक कु.दिव्या भागवत कोल्हे ८९ .८०% तर तृतीय क्रमांक कु.जयश्री भगवान धनगर८८ .८े% हिने मिळवला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के.पाटील, उपप्राचार्य तथा केंद्र संचालक ए. एस. इंगळे ,पर्यवेक्षक व्ही.ए .काटकर, व्ही.टी.नन्नवरे यांनी यशस्वी विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या यशामध्ये सहकार्य करणार्‍या शिक्षक -शिक्षकेतर यांचे सुद्धा अभिनंदन केले आहे.

Protected Content