यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या येथील यावल तालूका खरेदी विक्री सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १o८ नामनिर्दशन अर्ज विक्री झाले असुन एकुण ८८ उमेदवारांनी आपले नामनिर्दशन अर्ज दाखल केले असून सोमवार ८ जानेवारी सोमवार हे अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवस होते.
यावल खरेदी विक्री सहकारी संघाची ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिनांक ८ जानेवारी सोमवार रोजी नामर्निदेशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १०८ अर्जाची विक्री झाली. ४ जानेवारी रोजी ४५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर आज शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने एकूण ८८ इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे.
यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत एकुण १७ संचालक निवडीसाठी २८७३ मतदार व सहकारी सोसायटीचे ४८ मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, प्रमुख नामर्निदेशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान चेअरमन अमोल सुर्यकांत भिरूड यांच्या विद्यमान संचालक प्रभाकर अप्पा सोनवणे, विनोदकुमार पाटील, सुनिल बाळकृष्ण नेवे, नरेन्द्र नारखेडे, तुषार सांडूसिंग पाटील, उमेश रेवा फेगडे, महेन्द्र तळेले गणेश गिरधर नेहते, नितीन नेमाडे, यशवंत तळेले, प्रशांत चौधरी, तेजस पाटील, भारती चौधरी, नितिजा किरंगे व तज्ञ संचालक डॉ. हेमंत येवले व लहु पाटील यांचा समावेश आहे. दुय्यम निबंधक सहकार संस्था कार्यालय यावलचे मुख्य लिपिक के. व्हि. पाटील हे कामकाज पाहिले, या निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे हे काम पहात आहे. दरम्यान ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी काही राजकीय मंडळी प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे .