Home क्राईम अहमदनगरमधून 84 लाख तर सोलापुरातून 23 लाखांची रोकड जप्त

अहमदनगरमधून 84 लाख तर सोलापुरातून 23 लाखांची रोकड जप्त


rokad
 

अहमदनगर/सोलापूर (वृत्तसंस्था) ऐन निवडणुकीच्या काळात अहमदनगर शहरात तब्बल 84 लाख तर सोलापूरमध्ये 23.5 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, अहमदनगर शहरातील वैदूवाडी परिसरात रिक्षातून 84 लाख रुपये येत असल्याची गुप्त माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. दरम्यान ही रक्कम इथे कशासाठी आणली याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. दुसरीकडे सोलापूरमध्येही 23.5 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. कामती पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ही कारवाई केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound