रावेर प्रतिनिधी । रावेर ग्रामीण भागात केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचे ८१३ घरकुले अपूर्ण आहे. गेल्या ५ वर्षांपासून शासकीय घरकुल योजनेचे काम सुरु असून आतापर्यंत ८१ टक्के घरकुले तालुक्यात पूर्ण झाले असून “ब” च्या यादी वरील घरकुलचे कामे प्रगतीपथावर सुरू आहे.
रावेर ग्रामीण भागात केंद्र व राज्य सरकारच्या ८१३ घरकुले अपूर्ण आहे. मागील पाच वर्षापासून हक्काचे शासकीय घरकुल योजनेचे काम सुरु असून आता पर्यंत ८१ टक्के घरकुले तालुक्यात पूर्ण आहे. अद्याप ‘ब’ च्या यादीवरील घरकुलचे कामे सुरु आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे तालुक्यात २ हजार ६०९ घरकुले मंजूर असून यातील ३१६ घरकुले अद्याप अपूर्ण आहे.शबरी आवास योजना ३८८ घरकुले मंजूर असून ८० घरकुले अपूर्ण आहे. रमाई आवास योजना १ हजार ३५४ यातील ४१७ घरकुले अपूर्ण आहे.पारधी आवास योजना दोन मंजूर असून दोघेही अपूर्ण आहे. या घरकुल योजने मागील २०१६ पासून कामे सुरु आहे.
तालुक्यात ४ हजार ३५३ घरकुले मंजूर
रावेर तालुक्यात केंद्र व राज्याचे ४ हजार ३५३ घरकुले मंजूर असून त्यापैकी ३ हजार ५४० घरकुले पूर्ण झाले आहे. तर अद्याप तालुक्यात विविध योजनेचे ८१३ घरकुले अपूर्ण आहे.