रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी ८१.९७ टक्के मतदान झाले असून ७५९ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले आहे. ४३ हजार ३५२ पुरुषांन पैकी ३५ हजार ६०९ मतदानाचा हक्क बजावला ४० हजार १७२ पैकी ३२ हजार ८५६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला ६८ हजार ४६५ मतदान तालुक्यात झाले आहे.
शुक्रवारी सकाळी सर्वत्र शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मोरगाव खुर्द, केऱ्हाळा बुद्रुक, विवरा बुद्रुक, विवरा खुर्द, निंबोल, ऐनपूर, तांदलवाडी रसलपूर, धामोडी या गावात अतिशय अटीतटीची व चुरशीची निवडणूक झाली.भोर येथील उमेदवार मतदारांना निवडणूक चिन्हाच्या चिट्ठ्या देत असल्याचा आक्षेप दोन उमेदवारांनी घेतल्याने या ठिकाणी गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या कारणाने दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत येथील मतदान केंद्र क्रमांक ३ बंद करण्यात आले होते.
येथे तात्काळ नायब तहसीलदार एम जे खारे व सी जी. पवार आल्यावर केंद्र सुरु झाले. उपनिरीक्षक मनोज वाघमारे व सहकारी तात्काळ केंद्रावर पोहचल्याने मतदान केंद्राजवळ झालेली गर्दी बाहेर काढली.मोरगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील यांनी तर तांदलवाडी येथे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, बाजार समितीचे सभापती व सरपंच श्रीकांत महाजन, निंबोल येथे पंचायत समितीचे सभापती जितू पाटील धामोडी येथे माजी आमदार अरुण पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.