जळगाव प्रतिनिधी । अलीकडच्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असतांना आज देखील हाच ट्रेंड दिसून आला आहे. आज दिवसभरात ८०८ रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असतांना तब्बल १०७६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर-१५४, जळगाव ग्रामीण-३१, भुसावळ-१३३, अमळनेर-२७, चोपडा-२९, पाचोरा-१६, भडगाव-१७, धरणगाव-९, यावल-२५, एरंडोल-१९, जामनेर-३८, रावेर-७८, पारोळा-३२, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-७५, बोदवड-४६ आणि इतर जिल्ह्यातील ८ असे एकुण ८०८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आतापर्यंत जिल्ह्यातून १ लाख २५ हजार ४५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख १३ हजार ४३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ९ हजार ७६८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण १९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.