जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ८०१ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आज जिल्ह्यात जळगाव शहरात १९३ एकाच दिवशी आढळून आले आहे. यासह एरंडोल, चोपडा आणि भुसावळ तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. आजच ५६२ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ८०१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १९३ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल एरंडोल-१२८, चोपडा-८२ तर भुसावळ तालुक्यात ६९ रूग्ण आढळून आलेत.
आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१९३; जळगाव ग्रामीण-३८; भुसावळ-६९; अमळनेर-५१; चोपडा-८२; पाचोरा-८; भडगाव-६; धरणगाव-२१; यावल-२०; एरंडोल-१२८; जामनेर-६२; रावेर-२०; पारोळा-१७; चाळीसगाव-५४; बोदवड-२२ व दुसर्या जिल्ह्यांमधील ८ असे एकुण ८०१ रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-६५०६; जळगाव ग्रामीण-१५७०; भुसावळ-१६४४; अमळनेर-२४२४; चोपडा-२४३३; पाचोरा-१०९२; भडगाव-१२८७; धरणगाव-१३५५; यावल-९१२; एरंडोल-१६९९; जामनेर-२२००; रावेर-१३३२; पारोळा-१४०७; चाळीसगाव-१७२०; मुक्ताईनगर-७८७; बोदवड-४०८ व दुसर्या जिल्ह्यांमधील १५७ असे एकुण २८ हजार ९३३
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २८ हजार ९३३ इतकी झालेली आहे. यातील २० हजार ८३० रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५६२ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ९ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ८३१ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ७ हजार २७२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews