८ वर्षीय ईशल तडवीने पूर्ण केले पवित्र रमजानचे ३० रोजे

सावदा ता.रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील रहिवासी ईशल सलीम तडवी हिने अवघ्या ८ वर्षांच्या कोवळ्या वयात पवित्र रमजान महिन्याचे सर्व ३० उपवास पूर्ण करत धार्मिक निष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे.

ईशल ही सलीम नशिर तडवी (पोस्टमास्तर, खिरोदा) आणि हाफीजा सलीम तडवी (शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा चुनवाडे, ता. रावेर) यांची कन्या असून, सध्या ती इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे. एवढ्या लहान वयात ईशलने नमाज, ईबादत आणि उपवासांचे काटेकोर पालन करून सर्वांची मनं जिंकली आहेत.

ईशल तडवीच्या या धार्मिक आस्थेची आणि निष्ठेची संपूर्ण परिसरात चर्चा असून तिचे कौतुक होत आहे. ती आसिम सरदार तडवी (ग्रामसेवक, पुरनाड) यांची भाची आहे. ईशलच्या या श्रद्धाभक्तीला सर्व स्तरातून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जात आहेत.

<p>Protected Content</p>