धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गृहरक्षक दलाचा ७९ वा वर्धापनदिन धरणगांव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने होमगार्ड पथकाने शहरातून सवाद्य पथसंचलन करून नागरिकांचे लक्ष वेधले. ६ डिसेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या या दलाच्या कार्याची आणि शहराच्या सुरक्षा व शांतता राखण्यात त्यांचे असलेले योगदान जनतेला समजावून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जळगाव जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार, प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे, केंद्र प्रमुख गंगाधर महाजन, सामग्री प्रबंधक सुभेदार मदन रावते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका समादेशक अधिकारी ईश्वर सखाराम महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन पार पडले.

इंदिरा कन्या महाविद्यालयापासून शहराच्या मुख्य रस्त्यावरून बॅन्ड पथकाच्या तालावर हे पथसंचलन झाले. या वेळी होमगार्ड जवानांनी शहरातील श्री छञपती शिवाजी महाराज स्मारक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले स्मारक आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांना माल्यार्पण करून परिसराची स्वच्छता केली. तसेच, जवानांना त्यांचे कर्तव्य, उद्देश, विमोचन, अग्निशमन, बचावकार्य आणि संघटनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
या पथसंचलनात पलटण नायक ईश्वर पाटील, लिपिक जानकीराम पाटील, होमगार्ड भिकन लोहार, रविंद्र बडगुजर, सुरेश महाजन, प्रताप वराडे, ईश्वर चौधरी, विजय रोकडे, अमर मराठे, भगवान महाजन, सागर पाटील, सागर भिल तसेच महिला होमगार्ड लता वाणी, रेखा चौधरी, अनिता शिरसाठ, शिल्पा ह्याळीज व बॅन्ड पथकातील सदस्य उपस्थित होते. नागरिकांनी होमगार्ड दलाच्या या शिस्तबद्ध आयोजनाचे आणि कार्याचे कौतुक केले.



