भडगावात एका दिवसात ७७ नवीन कोरोना बाधीत; जिल्ह्यात ३४५ पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात भडगाव तालुक्यात तब्बल ७७ नवीन रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यात नवीन बाधितांची संख्या तब्बल ३४५ असल्याचे सायंकाळच्या रिपोर्टमधून दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ३४५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आजवर बहुतेक दिवशी जळगाव शहरातील सर्वाधीक रूग्ण असत. आज मात्र भडगाव तालुक्यातील सर्वाधीक ७७ रूग्ण आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव शहरात ५० तर पाचोरा तालुक्यात ४४ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-११; भुसावळ-९; अमळनेर-३१; चोपडा-२२; धरणगाव-१७; यावल-३; जामनेर-२९; रावेर-७; पारोळा-१५; चाळीसगाव-१४; मुक्ताईनगर-१४ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील २ असे रूग्ण आढळून आले आहेत. आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या १२३८१ इतकी झालेली आहे. यातील ८६९३ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच २२४ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १५ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ५६४ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ३१२४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

jalgaon corona news, jalgaon corona today status, jalgaon corona positive, bhadgaon corona news, bhusawal corona news, amalner corona positive, chalisgaon corona news, chalisgaon corona news, raver corona news, jalner corona news, jamner todays corona positive, jalgaon news

Protected Content