सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिक तरुणांना 75 टक्के आरक्षण : अजित पवार


सोलापूर (प्रतिनिधी) सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देणार असून, त्यासाठी कायदा करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सोलापुरात केली आहे.

 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. मुलाखतीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आघाडीबाबत काहीही वक्तव्य केले असले तरी आम्ही ते दुखावतील असे उत्तर देणार नाही. पण समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन झाले, अन्यथा सोलापूरचा निकाल वेगळा असता, असेही त्यांनी सांगितले.

Protected Content