रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७२ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रावेर तालुक्यातील रसलपूर येथे घडली आहे. वाढत्या चो-यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत वृत्त असे की, “सोमवारी रात्री रावेर तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी असलेल्या फरजाना बी शेख शाकिर यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाला असलेल्या कुलूपाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
बेडरूममध्ये स्टीलच्या कोठीचे कुलूप चोरट्यांनी तोडत त्यात ठेवलेले तीस हजार रुपये रोख व मेकअप बॉक्समधील सोने चांदीचे दागिने असे एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत फरजाना बी शेख यांनी देलेल्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार विशाल सोनवणे आणि सहकारी करत आहे.