जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील श्रावण नगर भागात बंद घर फोडून घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. या संदर्भात रात्री ८ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, नितीन हिरालाल खुशावह वय-४३, रा. श्रावण नगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मोलमजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. कामाच्या निमित्ताने ते घर बंद करून गावाला गेले होते. दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घेर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. नितीन कुशावह हे शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. याप्रकरणी रात्री ८ वाजता शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय शेलार हे करीत आहे.