Home आरोग्य जिल्ह्यात आज ७ नवे कोरोना बाधीत रूग्ण; ८ जण झाले बरे

जिल्ह्यात आज ७ नवे कोरोना बाधीत रूग्ण; ८ जण झाले बरे


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ७ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून ८ जण बरे झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात एकूण ७ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर ८ जण बरे झाले आहेत. यातील 3 पेशंट हे जळगावातील असून चोपड्यातील, पाचोऱ्यातील, रावेरमाधील आन मुक्तैनगर येथील प्रत्येकी १ पेशंटचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान, आजच ८ रूग्णांनी कोविडवर मात केल्याचेही यात म्हटलेले आहे.

मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाला होता. यानंतर आता नव्याने रूग्ण वाढू लागले असून प्रशासनाने लसीकरण आणि त्यातही बुस्टर डोसही सुरु केले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ६४ इतकी झाली आहे.


Protected Content

Play sound