मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी आणि आचारसंहिता लागण्याआधीच महायुतीच्या सरकारने मोठे पाऊल उचलले. राज्यपाल नियुक्त १२ पैकी ७ आमदारांचा शपथविधी सोहळा विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे पार पडला.
विधीमंडळात उपसभापती नीलम गो-हे यांच्या उपस्थितीत हा सोहळा घेण्यात आला. अशामध्ये ७ पैकी ३ भाजप, २ शिवसेना शिंदे गट तर २ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली.
मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना आमदारकीची शपथ घेतली. तर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे तसेच, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इंद्रीस नायकवडी, पंकज भुजबळ यांनी राज्यपाल राज्यपाल कोट्यातून आमदारकीची शपथ घेतली.