अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरूड हायस्कूलचा निकाल ६७ टक्के निकाल लागला असून धिरज वैराळे या विद्यार्थ्याने ८२.६० टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे.
शिरूड हायस्कूलमध्ये धीरज वैराळे प्रथम तर द्वितीय क्रमांक लोकेश दत्तात्रय बोरसे ७८.८० तर अभिषेक उंदीलाल वानखेडे या विद्यार्थ्याने ७८.२० टक्क्यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. धिरज वैराळे या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून त्याचे वडील कपाशीच्या जिनिंगमध्ये हमालीचे काम करतात. असे असताना धिरजने आपल्या परिस्थिवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.
धीरजच्या या यशाबद्दल शिरूड हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.एम.पाटील,जे.व्ही.बागुल, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच बहुजन रयत परिषद या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे, तालुकाध्यक्ष संजय मरसाळे यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन केले करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.