जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या आर्थिक वर्षात 657 कोटीचा निधी विविध विकासकामासाठी खर्च झाला असून चालू आर्थिक वर्षात 755.99 कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. राज्यात विकास कामासाठी निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याची आघाडी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून लवकरच त्या बाबत नियोजन केले जाणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. सुरेश भोळे, आ. लता सोनावणे, सर्व अशासकीय सदस्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलु केजो, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी, विजय शिंदे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा खर्च
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 510.00 कोटी नियतव्यय मंजुर होता व त्यानुषंगाने संपुर्ण निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला होता. प्राप्त निधीमधून दिनांक 31 मार्च, 2024 अखेर रु. 510.00 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून संपुर्ण वितरीत निधी खर्च झालेला आहे. किरकोळ रु. 4000/- इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर तांत्रिक कारणास्तव पुनर्विनियोजन करता येत नसल्याकारणाने शासन स्तरावर समर्पित करण्यात आलेला आहे.
अनुसुचित जाती उपयोजना
जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 92.00 कोटी नियतव्यय मंजुर होता व त्यानुषंगाने दिनांक 31 मार्च, 2024 अखेर रु. 92.00 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून संपुर्ण वितरीत निधी खर्च झालेला आहे.
आदिवासी घटक कार्यक्रम
जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 55.92 कोटी नियतव्यय मंजुर होता व त्यानुषंगाने संपूर्ण निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला होता. प्राप्त निधीमधून दिनांक 31 मार्च, 2024 अखेर रु. 55.92 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून संपुर्ण वितरीत निधी खर्च झालेला आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) व जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना) अंतर्गत सन 2023-24 करिता खर्चाची टक्केवारी ही 100.00 टक्के इतकी आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गत दिनांक 31 मार्च, 2024 अखेर खर्चाचा तपशिल खालीलप्रमाणे.
मंजुर नियतव्यय सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकुण 657.92
अर्थसंकल्पीत तरतुद सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकुण 657.92
BDS वर प्राप्त निधी सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकुण 657.92
यंत्रणांना वितरीत निधी सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकुण 657.92
31 मार्च, 2024 पर्यंत खर्च सर्वसाधारण 510.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 92.00 आदिवासी उपयोजना (TSP) 24.04 आदिवासी उपयोजना (OTSP) 31.88 असे एकुण 657.92
आणि वितरीत तरतूदीशी खर्चाची टक्केवारी ही सर्वसाधारण 100.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 100.00 आदिवासी उपयोजना (TSP) 100.00 आदिवासी उपयोजना (OTSP) 100.00 असे एकुण 100.00
जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा खर्च
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 607.00 कोटी नियतव्यय मंजुर आहे. मंजुर नियतव्ययापैकी रु. 202.31 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीमधून दिनांक 24 जुलै, 2024 अखेर रु. 25.02 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून रु. 11.63 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.
अनुसुचित जाती उपयोजना
जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) सन 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 93.00 कोटी नियतव्यय मंजुर आहे. मंजुर नियतव्ययापैकी रु. 30.69 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीमधून दिनांक 24 जुलै, 2024 अखेर रु. 15.45 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून रु. 15.45 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.
आदिवासी घटक कार्यक्रम
जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना) सन 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 26.09 कोटी नियतव्यय मंजुर असून त्यानुषंगाने रु. 8.70 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीमधून दिनांक 24 जुलै, 2024 अखेर रु. 1.21 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून कार्यान्वयीन यंत्रणा स्तरावर संपुर्ण निधी खर्च झालेला आहे.
तसेच जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2024-25 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 29.90 कोटी नियतव्यय मंजुर असून त्यानुषंगाने रु. 9.97 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीमधून दिनांक 24 जुलै, 2024 अखेर रु. 0.06 कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून रु. 0.04 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 अंतर्गत दिनांक 24 जुलै, 2024 अखेर खर्चाचा तपशिल खालीलप्रमाणे.
मंजुर नियतव्यय सर्वसाधारण 607.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 93.00 आदिवासी उपयोजना (TSP) 26.09 आदिवासी उपयोजना (OTSP) 29.90 असे एकुण 755.99
अर्थसंकल्पीत तरतुद सर्वसाधारण 607.00, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 93.00 आदिवासी उपयोजना (TSP) 26.09 आदिवासी उपयोजना (OTSP) 29.90 असे एकुण 755.99
BDS वर प्राप्त निधी सर्वसाधारण 202.31, अनुसुचित जाती उपयोजना(SCP) 30.69 आदिवासी उपयोजना (TSP) 8.70 आदिवासी उपयोजना (OTSP) 9.97 असे एकुण 251.66
यंत्रणांना वितरीत निधी सर्वसाधारण 25.02, अनुसुचित जाती उपयोजना(SCP) 15.45 आदिवासी उपयोजना (TSP) 1.21 आदिवासी उपयोजना (OTSP) 0.06 असे एकुण 41.74
24 जुलै, 2024 पर्यंत खर्च सर्वसाधारण 11.63, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 15.45 आदिवासी उपयोजना (TSP) 1.21 आदिवासी उपयोजना (OTSP) 0.05 असे एकुण 28.34
आणि वितरीत तरतूदीशी खर्चाची टक्केवारी ही सर्वसाधारण 12.37, अनुसुचित जाती उपयोजना (SCP) 50.34 आदिवासी उपयोजना (TSP) 13.91 आदिवासी उपयोजना (OTSP) 0.60 असे एकुण 16.59
जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे पुनर्विनियोजन (अंतिम सुधारीत तरतूद)
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 510.00 कोटी नियतव्यय मंजुर होता. काही योजनांतर्गत मोठी कामे मंजुर केल्याने व अशी कामे पूर्ण न झाल्याने त्याचप्रमाणे काही योजनांमध्ये मागणी प्राप्त न झाल्याने रु. 65.18 लक्ष रकमेची बचत होती. सदर बचत आवश्यकतेनुसार ज्या योजनांमध्ये प्राधान्याने कामे घेण्याची आवश्यकता आहे अशा कामांसाठी वळती करण्यात आली. त्याबाबत क्षेत्रनिहाय तपशिल खालीलप्रमाणे.
महसुली गाभा क्षेत्रात झालेली बचत 37.12 आणि जादा मागणी 47.99
महसुली बिगर गाभा क्षेत्रात झालेली बचत 14.42 आणि जादा मागणी 3.56
भांडवली गाभा क्षेत्रात झालेली बचत 10.3 आणि जादा मागणी 10.93
भांडवली बिगर गाभा क्षेत्रात झालेली बचत 3.61 आणि जादा मागणी 2.70
एकुण पुनर्विनियोजनात झालेली बचत 65.18 आणि जादा मागणी 65.18
अनुसुचित जाती उपयोजना
जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 92.00 कोटी नियतव्यय मंजुर होता. योजने अंतर्गत काही योजनांसाठी रु. 64.69 लक्ष इतक्या रकमेची बचत झाली व सदर बचत पुनर्विनियोजनाद्वारे आवश्यकतेनुसार इतर योजनांकडे वळती करण्यात आलेली आहे.
आदिवासी घटक कार्यक्रम
जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. 55.92 कोटी नियतव्यय मंजुर होता. कार्यान्वयीन यंत्रणांकडून निधी मागणी प्राप्त न झाल्याने तसेच काही योजनांसाठी आवश्यकतेनुसार प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर रु. 3.67 लक्ष रकमेची बचत झाली व झालेली बचत आवश्यकतेनुसार इतर योजनांकडे वळती केली.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गत मंजुर विशेष कामे
प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये लाखात
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसविणे रक्कम रुपये 199.99
जळगांव शहरात वारकरी भवन इमारतीचे बांधकाम करणे रक्कम रुपये 606.47
जळगांव येथे महिला व बालविकास भवन इमारतीचे बांधकाम करणे रक्कम रुपये 500.00
सामान्य रुग्णालयासाठी 1. सामान्य रुग्णालय, जळगांव, 2. ग्रामिण रुग्णालय, न्हावी ता. यावल, 3. ग्रामिण रुग्णालय, बोदवड, 4. ग्रामिण रुग्णालय, अमळगांव ता. अमळनेर, 5. ग्रामिण रुग्णालय, एरंडोल ता. एरंडोल, 6. ग्रामिण रुग्णालय, भडगांव ता. भडगांव, 7. ग्रामिण रुग्णालय, मेहुणबारे ता. चाळीसगांव, 8. ग्रामिण रुग्णालय, पिंपळगांव हरेश्वर ता. पाचोरा या 8 रुग्णालयांसाठी प्रत्येकी 1 (रु. 18,06,300/- प्रति रुग्णवाहीकाप्रमाणे) अशा एकूण 8 पेशंट ट्रान्सपोर्ट टाईप बी एसी रुग्णवाहिका खरेदी रक्कम रुपये 144.50
अजनाड ता. रावेर येथे पुनर्वसित संपूर्ण गावास विद्युतीकरण करणे रक्कम रुपये 126.84
सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर यांच्या अखत्यारित असलेल्या (अमळनेर, एरंडोल, पारोळा व धरणगांव) मधील एकूण २४ अपघात प्रवण क्षेत्रांचे अल्पकालिन उपाययोजना करणे रक्कम रुपये 135.68
जळगांव येथे रामानंद नगर पोलीस स्टेशन इमारतीचे बांधकाम करणे ता. जळगांव रक्कम रुपये 444.62
जळगांव पोलीस घटकातील पाळधी दुरक्षेत्र प्रस्तावित पाळधी पोलीस ठाणे इमारतीचे नवीन बांधकाम करणे ता. धरणगांव जि. जळगांव रक्कम रुपये 423.92
जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र जळगांव या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे ता. जळगांव रक्कम रुपये 517.74
जिल्ह्यातील 70 जिल्हा परिषद शाळांना क्रीडा साहित्य पुरविणे
जळगांव जिल्ह्यातील नवजात बालकांसाठी व्यापक स्तनपान व्यवस्थापन केंद्र (Comprehensive Lactation Management Centre) CLMC तयार करणे रक्कम रुपये 155.00
जळगांव जिल्ह्यातील नदी व जंगल परिसरातील हातभट्टी निर्मिती केंद्रांवर प्रभावी कारवाईसाठी ड्रोन व बोट खरेदी करणे रक्कम रुपये 74.76
भूमी अभिलेख कार्यालयासाठी रोवर मशिन युनिट कार्यप्रणाली व टॅब युनिट १५ नग खरेदी करणे रक्कम रुपये 180.00
उपविभागीय अधिकारी पाचोरा, तहसिलदार जळगाव, तहसिलदार धरणगाव, तहसिलदार पारोळा, तहसिलदार जामनेर, तहसिलदार भुसावळ व तहसिलदार मुक्ताईनगर यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांऐवजी नविन 7 चारचाकी वाहनांची खरेदी करणे रक्कम रुपये 71.68
मुक्ताईनगर, भुसावळ शहर, फैजपुर, पहुर, धरणगाव, जळगाव शहर, चोपडा ग्रामीण, चाळीसगाव शहर, अमळनेर शहर असे एकूण 9 पोलिस स्टेशन लोकाभिमुख व हायटेक (मॉडेल) करणे रक्कम रुपये 81.00
एकूण 11 ठिकाणी पोलीस चौकी सिमेंट शीट (18 MM) मध्ये तयार करणे रक्कम रुपये 186.34
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथील शल्यचितीत्साशास्त्र विभागासाठी Electromagnetic Shock Wave Emitter Technology (Turnkey Project) खरेदी करणे (1 नग) रक्कम रुपये 899.60
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील शल्यचिकीत्साशास्त्र विभाग अंतर्गत असलेले जळीत कक्षासाठी अद्ययावत बर्न युनिट (बर्न वार्ड) टर्नकी प्रोजेक्ट खरेदी करणे (UPGRADATION OF BURN WARD) रक्कम रुपये 424.50
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथे परिपुर्ण व अत्याधुनिक अतिदक्षता (Supply Installation & Commissisoning of intensive care unit) प्रस्थापित करणे रक्कम रुपये 294.41
जिल्हा रुग्णालय, जळगांव येथे एसएनसीयु विभागाचे मॉड्युलर एसएनसीयु तयार करणे रक्कम रुपये 597.90
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत योजनांच्या सामाजिक परिणामांचे विश्लेषण Social Impact Analyasis) करणे रक्कम रुपये 8.50
शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांकडून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत कामांचे तांत्रिक लेखा परिक्षण व स्ट्रक्चरल ऑडीट करणे रक्कम रुपये 118.00 असा निधी खर्च झालेला आहे.