चाळीसगाव (प्रतिनिधी)। चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणावर आमली पदार्थ असलेला गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकाजवळ सापळा रचून दोन वाहनांत सुमारे 600 किेलो गांजाची वाहतूक करत असल्याचे उघडकिस आले. याबाबत तिघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर महिती अशी की, आंध्रप्रदेशातून काही व्यक्ती चाळीसगाव शहरात गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम, सपोनि रविंद्र बागुल, जानकर, पोहेकॉ मनोज देशमुख, रामचंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, अश्रफ शेख, रवी पाटील, इद्रिस पठाण, किरण चौधरी, संजय सपकाळे, दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी आदींनी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकाजवळ सापळा रचुन दोन वाहनांची तपासणी केली असता त्यात सुमारे ५९३ कीलो गांजा आढळून आला. हा गांजासह 40 लाख रूपये रोख असे एकुण ७० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन वाहनांनसह शुभम राणा (वय-22), भुषण पवार (वय-33) दोन्ही रा.चाळीसगाव आणि रवींद्र शिंदे (वय-55, रा. भुसावळ) या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आज पर्यंतच्या कारवाईत येवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडण्यात आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.