पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील वाडी येथील ६९ शेतकऱ्यांनी ८४ लाख रुपयांचा कापूस व्यापाऱ्यास विकला होता. व्यापाऱ्याने ८४ लाख रुपयांचा गंडा शेतकऱ्यांना घातला असल्याने येथील साई मंदिराच्या ओट्यावर ६० शेतकरी उपोषणाला बसले आहेत.
उपोषणकर्ते यांना जागृत जनमंचचे अध्यक्ष शिवराम पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाब पाटील यांनी पाठिंबा देवून उपोषणाला बसले आहेत. उपोषण स्थळी पोलिस उपाधिक्षक भारत काकडे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, युवानेते सुमित किशोर पाटील यांनी भेटी दिल्या आहेत. पण त्यांना न्याय मिळालेला नाही.
शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. तालुक्यातील वाडी येथील शेतकऱ्यांनी अतिशय कष्ट करून कापूस पिकवला होता. मात्र क्षणात एका व्यापाऱ्याने त्यांना रस्त्यावर आणले. शेतकऱ्यांनी कापसाचे बियाणे, औषधे, खते उधारीवर घेतलेले आहेत. दुसरीकडे कापसाचे पैसे न मिळाल्याने उदारीवर घेतलेले बियाण्याचे पैसे परत न गेल्याने व्यापारी तगादा लावत आहेत. तर येणार्या वर्षाचा खरीपाचा हंगाम सुरू होत असल्याने पैशाअभावी शेती तयार करता येत नाही. यामुळे तब्बल ६० शेतकऱ्यांना पेरणीपासून वंचित राहावे लागणार असून शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उपोषणाचा आज आठवा दिवस असून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/282296670707551