फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे संभाजी राजे दुर्गोत्सव मित्र मंडळ व साई ग्रुपच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त श्री सप्तशृंगी देवीची स्थापना करण्यात आली असून मंडळाच्या वतीने देवी मातेला ५६भोगदेऊन या ठिकाणी २१ दांपत्यांच्या हस्ते हस्ते सामूहिक आरती करण्यात आली.
या कार्यक्रमास फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग व पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक आरती व ५६ भोग नैवेद्याचे आयोजन करण्यात आले. डॉ उमेश चौधरी ,डॉ गौरव चौधरी,अजय चौधरी, पवन सराफ, राहुल गुजराती ,बबलू महाजन ,अमोल बक्षे, नंदू अग्रवाल, पिंटू वर्मा ,कमलेश खिलोशिया, विकी जैस्वाल, चंदन चौधरी ,भूषण भिरुड, गोटू परदेशी ,सह२१ दाम्पत्यांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यातआली. नवरात्र उत्सव काळात मातेला आवडणार्या५६ नैवेद्यांची आरास या ठिकाणी करण्यात आली होती व त्यानंतर उपस्थितांना या नैवेद्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन साळी, यश वर्मा, ईश्वर भंगाळे, गुणवंत तेली, निशी वर्मा, देविदास कोष्टी, झील वर्मा आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी यांनी केले.