जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील ज्वेलर्स दुकान फोडून दुकानातून ५५ हजार रुपये किमतीच्या चांदीचे दागिने, बेन्टेक्स दागिने आणि सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद गावात दीपक नामदेव सोनार वय 39 हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून सोनारचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे गावात असलेल्या मरीमाता मंदिराजवळ बिदाई ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दरम्यान 2 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान त्यांचे दुकान बंद असताना त्यांच्या दुकानातून 55 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, फॅन्सी बेन्टेक्सचे दागिने आणि ५ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीला आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.