जामनेर(प्रतिनिधी) । शहरातील विवीध विकास कामांसाठी राज्यशासनाकडुन तब्बल 55 कोर्टीच्या अनुदानाला मंजुरी मिळाल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यशासनाकडे सतत पाठपुरावा करून शहरातील विकासकामांच्या उर्वरीत निधीला मंजुरी मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आल्याचेही पत्रकामधे नमुद करण्यात आले आहे. भडगाव, वरणगावसाठीही २ कोटी तर शेंदुर्णी ५ कोटींचा निधी मंजूर जामनेर पालीके प्रमाणेच जिल्ह्यातील भडगाव, वरणगाव व शेंदुर्णी शहराच्या प्रलंबित विकास कामांसाठीही ९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असुन, त्यामुळे आता विकासकामांना चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
55 कोटीतुन शहरातील पुढील विकास कामे होणार
राज्यशासनाच्या पर्यटन व सांस्कृतीक विभागामार्फत सोनबर्डी टेकडी विकसीत करणेकामी 15 कोटी. अल्पसंख्यांक विकास विभागाकडुन कब्रस्थान विकसीत करण्यासाठी 20 लाख रूपये. नगरविकासविभागाच्या वैशिष्ठपुर्ण योजनेअंतर्गत बगीचे-उद्यान, खुलीजागा विकसीत करणे, पथदिवे व स्वच्छतागृहे, गटार ईत्यादी कामांसाठी 15 कोटी. सामाजीक व विशेष न्यायविभागाच्या नगरोत्थान अभियानअंतर्गत दलीतवस्ती सुधार योजनेसाठी 2 कोटी. नगरविकासविभागाच्याच विवीध भागांमधील विकासकामांसाठी 5 कोटी. शहरातील भुयारी गटार योजनेसाठी 14 कोटी रूपये. पाणीपुरवठा योजनेसाठी 3:50 कोटी अशी सुमारे 55 कोटी अनुदान मिळाले आहे.
पालीकेमार्फत आणखी 80 कोटींचा प्रस्ताव
संपुर्ण शहरातील रस्ते विकसीत करण्यासाठी तसेच वृक्षलागवडीसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 50 कोटी,वैशिष्ठयपुर्ण योजनेअंतर्गत 30 कोटी अशा एकुण 80 कोटी रूपये अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे पालीकेमार्फत सादर करण्यात आला असुन त्यालाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचिही माहिती नगराध्यक्षा साधना महाजन यांनी दिली.