मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्याची कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी सुचविलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांची कामांना मंजूरी मिळाली आहे. यासाठी ५५ कोटी ४९ लाखांचा निधी मिळणार आहे.
यात मंजूर काँक्रिट रस्त्यांची झालेली कामे खालील प्रमाणे :-
* सुनोदा ते प्रजिमा -16 रस्ता ,उदळी सब स्टेशन ( एम आर एल-16, व्ही आर-18) लांबी 4.040 कि.मी. अंदाजित किंमत 5 कोटी 50 लक्ष
* सावदा रायपुर पार्ट लांबी – थोरगाव ते रायपुर रस्ता ( टी आर-12, ओ डी आर-19) लांबी 5.030 कि.मी. अंदाजित किंमत 7 कोटी 38
* वाघोदा बीके- दसनूर सिंगनूर ते बालवाडी रस्ता (एल आर 20, व्ही आर 80,30) लांबी 5.025 अंदाजित किंमत 7 कोटी 63 लक्ष
* सुदगाव ते मांगी – चुनवाडा रस्ता ( एम आर एल -15, व्ही आर – 05 ) लांबी 5.835 कि.मी. अंदाजीत किंमत 8 कोटी 31 लक्ष
* राममा -06 ते तालुका बॉर्डर पातोंडी जळगाव (पार्ट लांबी एमपी बॉर्डर ते अंतुर्ली – अंतुर्ली फाटा- पतोंडी- एम पी बॉर्डर) (कि.मी.14/565 ते 23/200) ( टी आर – 05, ओ डी आर – 24) लांबी 6.275 कि.मी. अंदाजीत किंमत 7 कोटी 40 लक्ष
* शेमळदे ते मेळसांगवे रस्ता ( एल आर – 27, व्ही आर-61) लांबी 4.145 कि.मी. अंदाजीत किंमत 6कोटी 68 लक्ष
* आमदगाव ते कोल्हाडी (एल आर -03, व्ही आर – 40) लांबी 4.410 कि.मी. अंदाजित किंमत 6 कोटी 25 लक्ष
* बोदवड – चिखली ते तालुका बॉर्डर रस्ता (भाग लांबी बोदवड ते शेवगा बु. चिखली रस्ता) (टी आर – 03, ओ डी आर 31) लांबी 5.860 कि.मी. अंदाजीत किंमत 6 कोटी 34 लक्ष
असे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकूण 8 कामे मंजूर झालेली असून, संपूर्ण कामांची लांबी 40.620 कि.मी. इतकी आहे. व संपूर्ण कामांची अंदाजित किंमत 55 कोटी 49 लक्ष इतकी आहे.