जळगाव प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील मुक्ताई शुगर अॅड एनर्जी लिमिटेड या कारखान्याला जिल्हा बँकेने शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५५ काेटींचे कर्ज मंजूर केले.
अामदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताई कारखाना हा बँकेच्या अध्यक्ष राेहिणी खडसे, संचालक माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा असून ते बेकायदेशीरपणे कारखान्याला बॅंकेकडून कर्ज घेत असल्याचा अाराेप केला हाेता. दरम्यान, शुक्रवारी अध्यक्षा राेहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली अायाेजित बैठकीस उपाध्यक्ष अामदार किशाेर पाटील, अामदार अनिल पाटील, संचालक संजय पवार, गुलाबराव देवकर, नानासाहेब देशमुख, डाॅ. सुरेश पाटील, तिलाेत्तमा पाटील, राजेंद्र राठाेड, गणेश नेहेते यांच्यासह अन्य संचालक उपस्थित हाेते.
संचालकांनी एकमताने मुक्ताई कारखान्याला ५५ काेटींच्या कर्जाला मंजुरी दिली. साेबतच मधुकर सहकारी साखर कारखान्याने मागणी केलेल्या २२ लाखांच्या कर्जाला मंजुरी दिली. मुक्ताई कारखान्याने मागणी केलेले कर्ज हे पूर्णपणे कायदेशीर व तांत्रिक बाबींची पडताळणी करून दिले असल्याचे बॅकेचे अामदार किशाेर पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.
माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन, अामदार सुरेश भाेळे, अामदार संजय सावकारे, नंदकिशाेर महाजन हे संचालक बैठकीला गैरहजर हाेते.