Home क्राईम झोपलेल्या वाघाला दगड मारणाऱ्यास ५१ हजारांचा दंड

झोपलेल्या वाघाला दगड मारणाऱ्यास ५१ हजारांचा दंड


istockphoto 488524871 612x612

जयपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रीय उद्यानात झोपलेल्या वाघाला दगड मारल्याच्या कारणावरून गाइडसह एका पर्यटकाला ५१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही घटना राजस्थानमधील रणथंभोर येथे मंगळवारी घडली. उद्यानातील पीलीघाट गेटवर वाघ झोपला असल्याचे पर्यटक आणि त्याच्या गाइडने पाहिले. त्यावेळी हा पर्यटक जिपमध्ये बसला होता. त्यानंतर गाइडने वाहनातून खाली उतरत वाघाला जागे करण्यासाठी दगड मारला.

 

हा प्रकार तेथील थर्मल कॅमेऱ्यात कैद झाला, त्यामुळेच एक पर्यटक आणि गाइडने नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार उद्यान प्रशासनाच्या लक्षात आला. प्रशासनाने त्यांना तातडीने उद्यानातून बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्याशिवाय, त्यांना ५१ हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आल्याचे विभागीय वन अधिकारी मुकेश सैनी यांनी सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाने पर्यटकांच्या दिवसभराच्या भेटींचे बुकिंग रद्द केले. तसेच गाइड व्यावसायिकांच्या उद्यानातील प्रवेशावरही तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound