अक्षय तृतीयानिमित्त स्वामिनारायण मंदिरात भरल्या ५०१ घागरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील नवनिर्माणाधीन स्वामीनारायण मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त ५०१ घागर भरणा तर्पण विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात एकूण ५०१ हरीभक्तांनी आपल्या पूर्वजांबद्दल तर्पण विधी करीता नाव नोंदणी केली आणि तेवढ्याच मातीच्या घागरी आणून शास्त्रोक्त पद्धतीने वेदोक्त मंत्रोच्चारात रत्नपारखी गुरुजी आणि त्यांच्या टीमने विधी पार पाडला . या मंगलमय प्रसंगी  नयनप्रकाशशास्त्री अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व सांगतांना म्हणाले की अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे . या दिवशी सतयुग,  कृतयुगाचा प्रारंभ झाला हे याच  दिवशी  वेद व्यासांनी महाभारत ग्रंथ लिखाणास सुरुवात केली होती . शिवाय गंगेचे स्वर्गातून अवतरण पृथ्वीवर याच दिवशी झाले होते . हा दिवस पितृ पुजनासाठी पुज्य मानला जातो. सुदामाने श्रीकृष्णास मूठभर पोह्यांची पिशवी याच दिवशी दिली.

तेव्हा श्रीकृष्णांनी नकळत सुदाम्यास अपार धनसंपत्ती दिली . श्रीकृष्णाने युधिष्ठिरास अक्षय पात्र याच दिवशी दिले तर द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरविले म्हणून अक्षय तृतीया हा दिवस लक्ष्मी आणि सुखकारक दिवस मानला जातो .या दिवशी दानधर्म जप, आदी कार्य अक्षय राहते. विष्णुसहस्त्रनाम पठण करणे पुण्य कर्म समजले जाते असे या दिवसाचे महत्त्व सांगितले . या कार्यक्रमास गुरुवर्य गोविंद स्वामी, पी.पी.शास्त्री ( सुरत ) यांचे आर्शीवाद मार्गदर्शन लाभले असून अतुल भगत यांनी संपूर्ण कार्यक्रमाची मांडणी केली. बहुसंख्य हरिभक्त  उपस्थित होते .

 

Protected Content