जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । प्रताप नगरातील मनियार होलसेल दुकानाचे पत्रे कापून आत प्रवेश करत काऊंटरमधून ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रताप नगरातील मनियार होलसेल दुकान आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी १० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता दुकान बंद करून सर्व कर्मचारी निघून गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी होलसेल दुकानाचे पत्रे कापून आत प्रवेश करत कॅश काऊंटर कटरने तोडून ५० हजारांची रोकड चोरून नेले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकानाचे मॅनेजी चेतन विजय सुलक्षणे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.