Home क्राईम बसस्थानक परिसरातून वृद्धाचे ५० हजार लंपास !

बसस्थानक परिसरातून वृद्धाचे ५० हजार लंपास !


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील अत्यंत गजबजलेल्या पाचोरा बस स्थानक परिसरातून एका ७० वर्षीय वृद्धाच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील उप्पलखेडा येथील रहिवासी असलेले सुभाष विठ्ठल भावसार (वय ७० वर्ष) हे कामानिमित्त पाचोरा येथे आले होते. २३ मार्च रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास ते पाचोरा बस स्थानक परिसरात असताना, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम अत्यंत शिताफीने चोरून नेली. आपले पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच भावसार यांनी तातडीने पाचोरा पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या लेखी तक्रारीवरून २४ मार्च रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राहुल शिंपी हे करीत आहे.


Protected Content

Play sound