Home क्राईम इनोवा गाडीतून ५ लाख लंपास; गुन्हा दाखल

इनोवा गाडीतून ५ लाख लंपास; गुन्हा दाखल

0
135

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-येथील ॲक्सीस बँकेसमोर असलेल्या गाडीतून चोरट्यांनी ५ लाखाची रोकड लंपास केली आहे.याबाबत रावेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी रावेर येथील स्टेशनरोडवरील ॲक्सीस बँके जवळ उभ्या असलेल्या वाघोदा येथील विशाल पाटील यांच्या काळ्या रंगाची इनोवा गाडीतुन तिचा क्रमांक एम एच १९ डि व्ही ०६६६ या गाडीत ठेवलेल्या लॅपटॅपचे काळ्या रंगाच्या पैशाने भरलेली बॅगमध्ये पाच लाख रुपये होते.

विशाल पाटील गाडीत बसलेले होते.त्यांना एका संशयिताने तुमची गाडी पंक्चर झाल्याचे सांगून त्यांना खाली उतरवण्यास भाग पाडले.या संधीचा फायदा घेत,चोरट्यांनी पाच लाख रुपये असलेले बॅग लंपास केली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव पुढील तपास करीत आहे.


Protected Content

Play sound