Home Cities अमळनेर वावडे गावात एकाच रात्री ५ घरे फोडली ; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविली

वावडे गावात एकाच रात्री ५ घरे फोडली ; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबविली


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील वावडे गावात बुधवारी २१ जानेवारीच्या पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री पाच घरे फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बीएसएफ जवान देविदास बारीकराव पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वावडे गावातील ५ वेगवेगळ्या घरांचे कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी फिर्यादी देविदास पाटील यांच्यासह इतर चार साक्षीदारांच्या घरातून ३० ग्रॅम सोन्याची पात, चांदीचे बार, सोन्याचे टॉगल, अंगठ्या आणि मोठी रोकड लंपास केली.

फिर्यादी देविदास पाटील यांच्याकडून सोन्याची पात व रोकडसह ६१ हजार रूपये आणि इतर घरातून सोन्याचे दागिने, रोकड असा एकुण १ लाख ५५ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच अमळनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी विनायक कोते आणि मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound