मंत्री रक्षा खडसेंच्या प्रयत्नाने रावेर मतदारसंघात ४९.११ कोटीचा निधी मंजूर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाकडून महसूल, आदिवासी विकास व सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत रु.49.11कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात रस्ते विकासाच्या सर्वाधिक कामांची तरतुद करण्यात आली आहेत, त्यासोबत 25 नवीन शासकीय कार्यालय इमारतींचे बांधकामे देखील मंजूर करण्यात आली आहे.

रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत मुक्ताईनगर, रावेर व यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील एकूण 23 ग्रामीण रस्त्यांसाठी रु.39.00 कोटी निधी तर, फैजपूर येथे नवीन उपविभागीय कार्यालय बांधकामसाठी रु.6.51 कोटी निधी, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर व यावल तालुक्यात विविध ठिकाणी 3 मंडळ अधिकारी कार्यालय व 21 तलाठी कार्यलय इमारत बांधकाम करणेसाठी रु.3.60 कोटी निधी यावेळी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये बोदवड, अंतुर्ली व कुऱ्हा येथे नूतन मंडळ अधिकारी कार्यालय बांधकाम करण्यात येणार आहे.

बोदवड तालुक्यातील जामठी, कोल्हाडी, एनगांव, हरणखेड ई. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगांव, चांगदेव, हरताळे, बेलसवाडी, कर्की इत्यादी यावल तालुक्यातील दुसखेडा, अकलूद, न्हावी प्र.यावल, परसाळे बु., पिंपरूळ, विरोदे ई. तर रावेर तालुक्यातील वाघोड, खिरोदा प्र.अ., निंबोल, केऱ्हाळे बु., गाते, निंभोरा बु. ई. ठिकाणी नूतन तलाठी कार्यालय इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे स्वीय सहायक तुषार राणे यांच्यामार्फत देण्यात आली.

Protected Content