उल्हासनगरातून ७५ किलो गांजासह ४८०० कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त; नार्कोटिक्स ब्युरोची कारवाई

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 75, किलो गांजा आणि तब्बल 4800 कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून पुढील तपास सुरू आहे.

उल्हासनगरमधील एक सिंडिकेट आंतरराज्य ड्रग्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पाळत ठेवून उल्हासनगरमधील एका कुरिअरच्या ऑफिसमध्ये धाड टाकली. यामध्ये कोडीन सिरपच्या 4800 बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच एकाला अटक करण्यात आली.

यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी परिसरात धाड टाकत 5 जणांना एका वाहनासह पकडण्यात आलं. या वाहनात 75 किलो गांजा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सापडला. तसेच या 5 जणांकडून 1 लाख 17 हजार 860 रुपये देखील जप्त करण्यात आले. या सगळ्यांना एनडीपीएस कायद्यान्वये अटक करण्यात आली असून सर्वांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू आहे. या सगळ्यामागे आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास सुरू आहे.

Protected Content