नाशिक शिक्षक मतदार संघात १ वाजेपर्यंत ४५.४४ टक्के मतदान !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षीक निवडणूकीसाठी आज बुधवारी २६ जून रोजी मतदान घेण्यात येत आहे. १ वाजेपर्यंत दरम्यान नाशिक शिक्षक मतदार संघात ४५.४४ टक्के मतदान झाले आहे.

विधान परिषदेच्या नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघासाठी निवडणुकीत एकूण २१ उमेदवार रिंगणात असले. तरी मात्र ही निवडणूक चौरंगी लढत आहे. यात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार यांनी कडवे अव्हान दिले आहे.

शिक्षक मतदारसंघात नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर येथे सुमारे ६९ हजारांवर मतदार आहेत. मतदान केंद्राच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रासाठी सहा कर्मचारी नियुक्त केले आहे. यात एक केंद्राध्यक्ष, ३ कर्मचारी, १ सूक्ष्म निरीक्षक, १ शिपाई असे ६ कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहेत. यासाठी मतदानासाठी 120 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content