जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयाने पाठवलेल्या अहवालात आज दिवसभरात चार कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहे. तर ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मिळालेल्या आहवालानुसार जळगाव शहरात २ आणि अमळनेर तालुक्यात २ असे एकूण ४ संक्रमित रुग्ण आढळून आले आहे. तर ६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६३८ बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर २६ संक्रमित रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.