जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ४ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर चार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालत आज भुसावळ तालुक्यातून तीन तर जळगाव शहरातून एक असे एकुण चार बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६९० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तसेच आतापर्यंत २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.